चला गड्यानो ! सुगंधी फुलांना माळुया's image
Love PoetryPoetry1 min read

चला गड्यानो ! सुगंधी फुलांना माळुया

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske March 27, 2022
Share0 Bookmarks 23 Reads0 Likes

चला गड्यानो ! प्रेमाच्या गावी 

ना भांडता प्रेमाने राहू तिथे

हक्क्काने बांधू माणुसकीची घरे

त्याला असतील विश्वासाची दारे


चला गड्यानो ! विसरू सारे हेवेदावे

नकोच आता ती सारी व्यर्थ भ्रमंती

पुन्हा नव्याने एक होऊ चला

मिळुनी सारे प्रेमात न्हाऊ आनंदाने


चला गड्यानो ! गतकाळातील चूका सुधारू

कुणी सांगावं उद्या आपण असेंन - नसेन  

पण यापुढेही सखाने नांदतील चारपिढ्या 

मोठ्या मनाने आभार मानू सर्वांचे ...चला गड्यानो ! सुगंधी फुलांना माळुया

बेशरम नी धोतऱ्याच्या फुलांना टाळूया 

प्रेमाचा गाव प्रेमाने वसवू थोडासा विसावा

अंती मिळेल थकल्या -भागल्या जीवाला

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts