भास सुकर जगण्याचा's image
Poetry1 min read

भास सुकर जगण्याचा

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske February 16, 2022
Share0 Bookmarks 21 Reads0 Likes

हा खेळ सावल्यांचा

हा मेळ बावळ्यांचा 

मन कृतार्थ त्यांचे

मायावी जग दावल्याचा


हा खेळ सावल्यांचा

हा खेळ बाहुल्यांचा

मन प्रसन्न त्यांचे

अमृत काळ दावल्याचा 


हा खेळ सावल्यांचा

इशाऱ्यावर नाचणाऱ्या

माकडांचा अन त्या

दरवेशी रायरंदाचा


हा खेळ सावल्यांचा

भास हा केवळ स्वप्नाचा

इथे कुणास वेळ वास्तव

काय, विस्तव शोधण्याचा


हा खेळ सावल्यांचा

बोलक्या बाहुल्याचा

सडकछाप गुंडाचा

जात्यंध माकडांचा



हा खेळ सावल्यांचा

केवळ खेळ आकड्यांचा

हा वेष गुलामांचा अन

स्वाथी पोटभरू मतलब्यांचा



हा खेळ असण्या-नसण्याचा 

भास सुकर जगण्याचा

जीव जातो सज्जन , साव

तुमचा आमचा सर्वांचा ...

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts