
आरसा असतो सत्याचा वास्तवदर्शी नमुना
जे असत तेच तो दाखवतो बिनदिक्कत
उजेडात सतर्क अंधारात मात्र गप्प असतो
हसतो ,रडतो ,लाजतो अन नाचतोही बिनधास्त
आरसा असतो कर्तव्यतत्पर सदोदीत
हक्क ठेवतो तो त्याचे सकलांचे अबादीत
करीत नसतो भेदभाव कधीच ,तो असो कुठेंही
कुणी निंदा कुणी वंदा तो करतो सोबत दरवेळी
आरसा असतो घरा - घरात पाहुणा बनून
कुणाचं नशीब घडवत नाही की बिघडवतही
पण तो असतो साबूत तो पर्यंतच सर्वांचा लाडका
फुटला की तो फेकून दिला जातो अडगळीत
आरसा असतो चार पिढयामधला दुवा
सान थोर, मौल मुलं मुली असो की आणखी कुणी
तो तितकाच असतो जवळचा प्यारा तीन प्रहरी
तो निभावतो नातं निस्वार्थपणे शेवट पर्यंत
आरसा असतो अनिवार जगण्याचाच भाग
निर्जीव तरीही असतो त्याचा सुखदुःखात सहभाग
तो रागावत नाही कधी की रुसत नाही कुणावर
पण तो तितकच निस्वार्थ निरागस प्रेम करतो सर्वांवर
No posts
No posts
No posts
No posts
Comments