
तसं पाहिलं तर तुम्ही बायका मतलबी संधीसाधू
अन आम्ही कुरवाळत बसतो इतिहास जुना
तुम्ही प्राप्त परिस्थितीनुरुप सारं काही विसरून
आमचं प्रेम असत मात्र समग्र जगणं उधळून
तुम्ही शपथा आणा भाका सपशेल विसरता
अन एक दिवस निःसंकोच मामा बनवता
किती बरं झालं असत आम्हालाही तुमच्यासारखं
वागता आलं असत अन जगणं सुकर झालं असत
तू अन मी जणू नाण्याच्या दोन बाजू
पण परस्पराविना दोघेही निःसंकोच आधु
तू सोशिक अबोल मी थोडासा बोलका
तुझं तसंच माझंही फरक फक्त एवढाच
मी व्यथांचा बाजार मांडतो नित नवा सदोदित
तू सहनशील कुढत बसतेस आतल्या आत
तुझा माझा मार्ग वेगळा जरी दुः ख सम समान
वर्तुळही ठरलेल आपापलं अंत मध्य अन आरंभही
तुझं सारं काही ठरलेलं मन मारून जगण्याचं
मी मात्र भरकटतोय काळाच्या खोल डोहात
जबाबदाऱ्यांचं ओझं माझ्यावर अन तुझ्यावरही
आपलं आपण ठरवायचं कण्हत जगायचं की गाणं म्हणत
No posts
No posts
No posts
No posts
Comments