आंधळे प्रेम's image
Poetry1 min read

आंधळे प्रेम

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske March 24, 2022
Share0 Bookmarks 24 Reads0 Likesतू न मला कधी आपलं मानलं

मी ही तुला कधी प्रपोज केलं

मोघमच सर्वस्व वाहिलं तरीही...


स्वप्नातील राजकुमारी तू

मी प्रेमनगरातील नवखा प्यादा

अबोल प्रेम अधांतरी शेवटपर्यंत तू सांगितले कधी मनातले

न मी विचारले तसले कधी

प्रेम जडले तुजवरी ...


मी न दिला गुलाब कधी 

न तू कधी होता मागितला

एकतर्फी प्रेमाचा खेळ सारा


प्रेम काय असतं ज्ञात तुला

न मलाही अवगत होत तेंव्हा

मैत्री आकर्षण की केवळ की भास


असेल- नसेल प्रेम मजवरी

तुझे तुलाच माहीत गडे ते

प्रेमळ ,लोभसवाणे हवेहवेसे 


एवढं मात्र खात्रीनं सांगावंस वाटतं

मी कधी विसरू शकलो न तुला

कदाचित तू मला विसरलीही असशील   
No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts